ऍड. यतीश नाईक तृणमूलमधून बाहेर

0
22

तृणमूल कॉंग्रेसचे सरचिटणीस ऍड. यतीश नाईक यांनी काल पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यतीश नाईक हे साळगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते; परंतु पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या नाईक यांनी काल पक्ष सदस्यत्वाचा आणि सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. तृणमूलने आपल्या ६ उमेदवारांची तिसरी यादी मंगळवारी जाहीर केली होती. त्यात साळगाव मतदारसंघातून भोलानाथ घाडी साखळकर यांना उमेदवारी दिली आहे.