उमेदवारी अर्जांसाठी शेवटचे दोन दिवस

0
16

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच दोनच दिवस शिल्लक राहिले असून, २८ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आत्तापर्यत सत्तरपेक्षा जास्त जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात मंत्री, आमदार, माजी आमदार व इतरांचा समावेश आहे.

राज्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी ३, दुसर्‍या दिवशी १५ आणि तिसर्‍या दिवशी ५० पेक्षा जास्त जणांनी अर्ज दाखल केले. दोनच दिवस उरल्याने गुरुवार आणि शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची गर्दी होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी २९ जानेवारीला केली जाणार आहे.