उत्तर प्रदेशात पुन्हा रेल्वे अपघाताचा प्रयत्न

0
5

काही दिवसांपूर्वी कानपूरमधील शिवराजपुरा भागात रेल्वे रुळावर गॅस सिलिंडर ठेवून कालिंदी एक्सप्रेस खाली उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसाच प्रयत्न पुन्हा एका करण्यात आला असून काल कानपूर सेंट्रल आणि फत्तेपूरदरम्यान प्रेमपूर रेल्वे स्थानकापासून काही मीटर दूर रेल्वे रुळावर काल (रविवारी) सकाळी 5 वा. सुमारास सिलिंडर आढळून आले आहे. मात्र, मोटरमनने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कानपूर सेंट्रलजवळ असलेल्या प्रेमपूर रेल्वे स्थानकापासून काही मीटर अंतरावर रेल्वे रुळावर गॅस सिलिंडर आढळून आले आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या एका महिन्याभरातील ही पाचवी घटना आहे. त्यामुळे रेल्वेचे अपघात घडवून आणण्यासाठी कट रचला जातो आहे का? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. काल (रविवारी) सुद्धा कानपूर सेंट्रल आणि फत्तेपूरदरम्यान प्रेमपूर या रेल्वे स्थानकापासून काही मीटर दूर रेल्वे रुळावर सिलिंडर आढळून आले आहे. काल सकाळी 5 वा. सुमारास या रुळावरून जाणाऱ्या मालगाडीच्या मोटरमनच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याने त्याने आपत्कालीन ब्रेक लावले. त्यामुळे मालगाडीचा अपघात टळला.