संजीवनी साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यासाठी नव्याने निविदा जारी केली जाणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री रवी नाईक यांनी विधानसभेत कृषी व इतर खात्यांच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना काल दिली. संजीवनी सहकारी साखर कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना कामावरून कमी केले जाणार नाही. संजीवनीमध्ये इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता, या प्रकल्पासाठी नव्याने निविदा जारी केली जाणार आहे. इथेनॉल प्रकल्पामध्ये कर्मचाऱ्यांना समावून घेतले जाणार आहे, असेही नाईक यांनी सांगितले.