आयकर खात्याची 31 ठिकाणी छापेमारी

0
4

आयकर खात्याच्या पणजीस्थित तपास व चौकशी विभागाने काल गोव्यासह मुंबई, दिल्ली, नोएडा व अमृतसर येथील आलिशान इमारती व अन्य बांधकामे करणाऱ्या मोठ्या बिल्डर्सवर काल छापे टाकले. त्यासाठी आयकर खात्याच्या बंगळुरू, दिल्ली, मुंबई, गुडगाव व डेहरादून येथील अधिकाऱ्यांच्या पथकांची मदत घेण्यात आली होती. ह्या पथकांनी काल एकूण 31 ठिकाणी हे छापे मारले. ह्या बिल्डर्सनी भारतासह दक्षिणपूर्व आशियातही मोठमोठ्या इमारती उभारून त्या पर्यटकांना भाडेपट्टीवर देण्याचा व्यवसायही सुरू केला असल्याचे छापासत्रादरम्यान स्पष्ट झाले. या छाप्यात आणखी काय काय घबाड सापडले याची माहिती आयकर खात्याने उघड केलेली नसून, पुढील अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या बिल्डर्सवर छापे टाकण्यात आले, त्यांनी करचुकवेगिरी केल्याचा संशय आयकर खात्याला आहे.