आम आदमी पार्टीला गोव्यातील राज्य पक्ष म्हणून भारतीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली असल्याची माहिती काल पक्षाच्या प्रसारमाध्यम विभागाने दिली. पक्षाच्या गोवा प्रभारी व दिल्लीच्या आमदार आतिशी सिंग यांनी ही माहिती दिल्याचे सांगण्यात आले. आपचे प्रदेशाध्यक्ष ऍड. अमित पालेकर यांनीही पक्षाला गोव्यातील राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.