आदित्य एल-1 यान आज सूर्याच्या दिशेने झेपावणार

0
7

चांद्रयान-3 च्या मोठ्या यशानंतर इस्रो आता थेट सूर्याच्या अभ्यासासाठी मोठी मोहीम हाती घेतली असून, आदित्य एल-1 यानाचे श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही एक्सएल रॉकेटद्वारे शनिवार दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता प्रक्षेपण केले जाईल.

आदित्य एल-1 या अंतराळयानाच्या प्रक्षेपणाचे काऊंटडाऊन काल सुरू केले. शुक्रवारी दुपारी 12.10 वाजता आदित्य एल-1 च्या प्रक्षेपणासाठी 23 तास 40 मिनिटांचे काउंटडाऊन इस्रोने सुरू केले.आदित्य एल-1च्या प्रक्षेपणापूर्वी काल इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ हेआंध्र प्रदेशातील चेंगलम्मा परमेश्वरी मंदिरात पोहोचले. येथे त्यांनी मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना केली.