आता गोवा भाजपला वाटतेय म्हादईची चिंता

0
4

कर्नाटकची विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर आता गोवा भाजपला म्हादई नदीवरील कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या डीपीआर मंजुरीमुळे म्हादईच्या अस्तित्वाबाबतीत चिंता वाटू लागली आहे. यापूर्वी म्हादईबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतलेल्या गोवा भाजपने काल म्हादई संरक्षणाचा ठराव राज्य कार्यकारिणीच्या संमत केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केंद्रीय जल आयोगाने म्हादई नदीशी संबंधित कर्नाटक राज्याच्या कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला मंजुरी दिल्याने या नदीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे, असे काल झालेल्या भाजप राज्य कार्यकारिणी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावात म्हटले आहे. ही राज्य कार्यकारिणी समिती म्हादई नदीच्या पाण्यावरील गोव्याचे कायदेशीर हक्क आणि हित जपण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यासाठी राज्य सरकारला जोरदार आग्रह करणार आहे, असेही ठरावात म्हटले आहे.