आणखी एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

0
37

गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने आणखी एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश काल केला. अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोनापावल-पणजी येथील एका बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून 14 जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून 5.5 लाख रुपये किमतीचे लॅपटॉप, मोबाईल संगणक व इतर साहित्य जप्त केले. अमेरिकन नागरिकांना तांत्रिक आणि सुरक्षा मदत करण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात होती. अमेरिकन नागरिकांना गिफ्ट कार्डाने पेमेंट करण्याची सूचना केली जात होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.