आंध्र प्रदेशची नवी राजधानी विशाखापट्टणम

0
59

विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवीन राजधानी असल्याची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी काल केली. दिल्लीमधील एका कार्यक्रमात जगनमोहन रेड्डी ही घोषणा केली. आम्ही 3 आणि 4 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे जागतिक शिखर परिषद आयोजित करत आहोत. मी तुम्हाला वैयक्तिकरित्या शिखर परिषदेसाठी आमंत्रित करण्यासाठी आलो आहे. विदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी आमच्या नव्या राजधानीला भेट द्यावी आणि आंध्र प्रदेश राज्यात व्यवसाय करणे किती सोपे आहे ते पहावे, असे आवाहन यावेळी रेड्डी यांनी केले. दरम्यान, सध्या राज्याची राजधानी अमरावती आहे.