‘अपना घरा’तून पसार 2 मुले पुन्हा ताब्यात

0
1

मेरशी येथील ‘अपना घरा’तून पळून गेलेल्या दोन मुलांना ताब्यात घेण्यात जुने गोवे पोलिसांनी यश प्राप्त झाले. मेरशी येथील अपना घरातून दोन मुलांनी खिडकीचे ग्रील वाकवून आणि बेडशीटचा वापर करून खाली उतरून पलायन केले होते. या घटनेबाबत जुने गोवे पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्वरित शोध मोहिमेला सुरुवात केली. एका मुलाला फातोर्डा येथे, तर दुसऱ्या मुलाला गदग-कर्नाटक येथे ताब्यात घेण्यात आले. त्यांना पुन्हा अपना घर व्यवस्थापनाच्या ताब्यात देण्यात आले.