अपघातास जबाबदार असलेल्यांनी राजीनामा द्यावा : खासदार सार्दिन

0
6

ओडिशा येथे नुकताच जो तीन रेल्वेगाड्यांमध्ये भीषण अपघात झाला त्याला जबाबदार असलेल्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा न दिल्यास सरकारने त्यांना कामावरून काढून टाकावे अशी मागणी काल दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा, असे मी म्हणणार नाही. पण रेल्वे अपघातविरोधी यंत्रणा बसवण्यासाठी त्यांनी आवश्यक ते सहकार्य केले नव्हते अशी माहिती जर उघड झाली तर मात्र त्यांना नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल, असे सार्दिन यांनी स्पष्ट केले. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रु. एवढी भरपाई देण्याचा जो सरकारने निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचे काँग्रेस स्वागत करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या प्रवाशांना 2 लाख रु. ऐवजी किमान पाच लाख रु.ची मदत देण्यात यावी, अशी मागणी सार्दिन यांनी केली.