अनुरा कुमारा दिसानायके श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

0
4

मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. अनुरा यांनी या निवडणुकीत नमला राजपक्षे, साजिद प्रेमदासा आणि रानिल विक्रमसिंघे या तीन उमेदवारांचा पराभव केला. जनता विमुक्ती पेरामुना पक्षाचे नेते दिसानायके या निवडणुकीत नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनले होते. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अनुरा यांचा राष्ट्रपतीपदापर्यंतचा प्रवास खूपच रंजक आहे. दिसानायके यांचा जन्म राजधानी कोलंबोपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या थंबुटेगामा येथे एका गरीब कुटुंबात झाला. दरम्यान, या निवडणुकीत पहिल्या फेरीत 50 टक्केपेक्षा जास्त मते एका उमेदवाराला न पडल्याने मतमोजणीची दुसरी फेरी घेण्यात आली. यामध्ये दिसानायके यांचा विजय झाला.