अंदमान-निकोबारच्या 21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे

0
3

अंदमान-निकोबारच्या 21 बेटांना सोमवारी देशाच्या परमवीरांची म्हणजे परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली. त्यात भारत-चीन युद्धात पायाने मशीनगन चालवणाऱ्या मेजर शैतान सिंह आणि कारगिल युद्धाचे हीरो कॅप्टन विक्रम बत्रा व मनोजकुमार पांडेय यांच्या नावांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यासंबंधीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.
अंदमानच्या भूमीवर पहिल्यांदा तिरंगा फडकवला गेला. येथे स्वतंत्र भारताचे पहिले सरकार स्थापन झाले. वीर सावरकर आणि देशासाठी लढलेल्या अनेक वीरांनी अंदमानच्या भूमीत तुरुंगवास भोगला. आज 21 बेटांना नावे देण्यात आली, त्यातून अनेक संदेश मिळणार आहेत. हा संदेश एक भारत श्रेष्ठ भारतचा असून, आपल्या सशस्त्र दलाच्या शौर्याचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
अंदमान-निकोबारमधील 21 बेटांना देशाच्या शूरवीरांची नावे देण्यात आली, त्यात नायक जदुनाथ सिंह, मेजर राम राघोबा राणे, मानद कॅप्टन करम सिंग, मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार जोगिंदर सिंग, लेफ्टनंट कर्नल धनसिंह थापा, कॅप्टन गुरबचन सिंह, कंपनी हवालदार मेजर पीरू सिंह, लान्स नायक अलबर्ट एक्का, लेफ्टनंट कर्नल अर्देशिर तारापोर, हवालदार अब्दुल हमीद, मेजर शैतान सिंह, मेजर रामास्वामी परमेश्वरन, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखों, सेकेंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, मेजर होशियार सिंग, कॅप्टन मनोज पांडेय, कॅप्टन विक्रम बत्रा, नायक सुभेदार बाना सिंग, कॅप्टन योगेंद्र सिंह यादव, सुभेदार मेजर संजय कुमार यांचा समावेश आहे.