हल्ला श्रीलंकेवर, धोका जगाला!

0
129
  • शैलेंद्र देवळणकर

श्रीलंकेतील हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि हे स्ङ्गोट घडवण्यासाठी जाणीवपूर्वक इस्टर संडेचा दिवस निवडण्यात आला. तसेच यासाठीची स्थळेही पूर्वनियोजित होती. या संपूर्ण प्रकाराला धार्मिक दहशतवादाचा प्रकार म्हणता येईल. विविध धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे हाच या हल्ल्यांमागचा उद्देश असतो.आज दक्षिण आशियातील कोणताही देश मूलतत्ववादापासून सुरक्षित राहिलेला नाही. ही धोक्याची घंटा आहे.

श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील ८ साखळी बॉम्बस्ङ्गोटांनी संपूर्ण जग हादरून गेले. ख्रिश्‍चन धर्मियांचा अत्यंत पवित्र सण असणार्‍या ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या या भीषण स्ङ्गोटांमध्ये सुमारे ३५० जणांंचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. श्रीलंकेमध्ये अशा प्रकारचा भीषण हल्ला पहिल्यांदाच झाला आहे. मागील काळात श्रीलंकेमध्ये ३० वर्षे यादवी युद्ध सुरू होते. हे युद्ध लिट्टे (लिबरेशन ऑङ्ग टायगर तमिळ ईलम) आणि सिंहली यांच्यादरम्यान होते. त्यावेळी लिट्टेेकडून १९९६ च्या दरम्यान असे बॉम्बस्ङ्गोट घडवण्यात आले होते. मात्र त्यातील मृतांचा आकडा ८० ते ९० इतका होता. रविवारच्या भयंकर स्ङ्गोटातील जीवितहानी मात्र त्याहून खूप मोठी आहे. २०१९ या नव्या वर्षातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.

काही आठवड्यांपूर्वी शांतताप्रेमी देश म्हणून जगभरात सुप्रसिद्ध असणार्‍या न्यूझीलंडमध्ये मशीदींवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याचे थेट लाईव्ह चित्रण समाज माध्यमांवर प्रसारित केले गेले होते. कोलंबोमधील हल्ल्ल्यांचा विचार करता, या संदर्भात भारताच्या गुप्तहेर यंत्रणांनी ११ एप्रिलला याबाबत श्रीलंकेला सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये श्रीलंकेतील विविध चर्चवर आणि भारतीय दूतावासावर हल्ला होण्याची शक्यता असल्याचे कळवले होते. एवढेच नाही तर एका संघटनेचे नावही घेतले होते. ही संघटना अत्यंत कट्टर मूलतत्ववादी मुस्लिम धार्मिक संघटना असून नॅशनल तौहिद जमात असे तिचे नाव आहे. ही संघटना श्रीलंकेमधील धार्मिक मूलतत्ववादी कट्टर धर्मांध संघटना आहे. श्रीलंकेच्या पूर्वेकडील भागात या संघटनेने मोठे जाळे विणलेले आहे. या संघटनेने १०० हून अधिक श्रीलंकन तरूणांना आयसिस संघटनेला जाऊन मिळण्यास प्रवृत्त केले होते. श्रीलंकेत हा एक विक्रम मानला जातो. २०१७-२०१८मध्ये श्रीलंकेमध्ये बौद्ध आणि मुसलमान यांच्यात ज्या जातीय दंगली झाल्या त्यात या संघटनेची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. या संघटनेकडून घातपाती कारवाया घडवल्या जाऊ शकतात, असा इ़शारा भारताने दिला होता. पण श्रीलंकेने त्याकडे दुर्लक्ष केले. पण भारताचा इशारा खरा ठरला.

श्रीलंकेच्या सरकारने नॅशनल तौहिद जमातचाच या हल्ल्यात हात असल्याचे म्हटले असले तरी या संघटनेने जबाबदारी आणि आरोप नाकारले आहेत. तथापि, या प्रकरणात २० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी आयसिसने २०१६ मध्ये बांगला देशामध्ये अशाच पद्धतीने हॉटेलमध्ये बॉम्बस्ङ्गोट केले होते.
दक्षिण पूर्व आशियामध्ये इंडोनेशियामध्येही अशाच प्रकारे हल्ला केला होता. नायजेरिया, इजिप्तमध्ये असेच स्ङ्गोट घडवून आणले होते. पाकिस्तानात २०१७ मध्ये लाहोरमध्ये ईस्टर संडेच्याच दिवशी अशा प्रकारचा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात ७६ ख्रिस्ती बांधव मृत्यूमुखी पडले होते. ईजिप्तमधील हल्लादेखील इस्टर संडेलाच झाला होता. या हल्ल्यांमागे असलेल्या संघटना प्रामुख्याने जिहादी संघटना होत्या. आत्तादेखील संशयाची सुई त्याच दिशेने आहे.

या सर्वांमधून आपल्याला काही प्रवाह स्पष्ट होतात. पहिला प्रवाह म्हणजे आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने आपले केंद्र पश्‍चिम आशियाकडून दक्षिण आशियाकडे सरकवले आहे. ही संघटना आता इराक आणि सीरियातून हद्दपार झाली आहे. नाटो सैन्याने हवाई हल्ले करून या संघटनेला निष्क्रिय केले आहे. परिणामी, आयसिसला आता नवे योद्धे हवे आहेत. त्यांना नवी भरती करायची आहे. त्यासाठी ते दक्षिण आशियामधील गरीब देशांना लक्ष्य करताहेत. अङ्गगाणिस्तान, नेपाळ, पाकिस्तान, बांग्लादेश, मालदिव, श्रीलंका या देशांमधील गरीब मुसलमानांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताहेत. मालदीव आणि श्रीलंकेमध्ये हा प्रकार अधिक आहे.
श्रीलंकेत मूलतत्ववादाचे जे लोण पसरले आहे त्याचे श्रेय सर्वस्वी पाकिस्तानला जाते. राजेपक्षे यांच्या काळात श्रीलंकेत चीनचा प्रभाव वाढला होता. त्याच काळात श्रीलंकेने पाकिस्तानबरोबर एक करार केला होता. त्यानुसार पारपत्राशिवाय पाकिस्तानी नागरिकांना श्रीलंकेत येण्याची अनुमती देण्यात आली. याचा पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग केला. मोठ्या प्रमाणावर जिहादी विचारसरणी पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला.

या पार्श्‍वभूमीवर भारताने आता सावध राहाणे गरजेचे आहे. भारताच्या राष्ट्रीय तपास समितीने गेल्या आठवड्यात देशभरात चार ठिकाणी छापे घातले होते. वर्धा, हैदराबाद, केरळ आदी ठिकाणी टाकलेल्या या छाप्यांमधून आयसिस संघटनेशी संबंधित काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. त्यातील माहितीनुसार भारतातही अशा स्वरुपाने बॉम्बहल्ला करण्याची तयारी होती असे समोर आले आहे. त्याच आधारावर भारताने श्रीलंकेला सूचक इशारा दिला. सध्या भारतात निवडणुकीचा काळ आहे. सर्वच सुरक्षा यंत्रणा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी व्यग्र असल्यामुळे आपण सावध राहाणे अत्यंत गरजेचे आहे.

आज दक्षिण आशियातील कोणताही देश मूलतत्ववादापासून सुरक्षित राहिलेला नाही. या देशांसाठी दहशतवाद ही एक महत्त्वाची मोठी समस्या झाली आहे. मुळातच दहशतवादी संघटनांची हिंमत का वाढते आहे किंवा मोठ मोठे हल्ले करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात कोठून येत आहे, हा यातील कळीचा मुद्दा आहे. याचे कारण काही देशांकडून दहशतवादी संघटनांना समर्थन मिळत आहे. त्यामुळे या संघटनांची हिंमत वाढत आहे. या संघटनांना एवढा पैसा, शस्त्रास्त्रे, हल्ल्यांसाठी स्ङ्गोटके सहजपणे मिळत नाहीच. त्यासाठी एक जाळे काम करत असते. त्यामुळे दहशतवादाला समर्थन देणार्‍या पाकिस्तानसारख्या देशांवर नियंत्रण आणले जात नाही तोपर्यंत दहशतवादी कारवायांना आळा घालण्याला मर्यादा आहेत.

यासंदर्भात अलीकडेच घडलेली एक घडामोड लक्षात घ्यायला हवी. ङ्ग्रान्स या देशाने संयुक्त राष्ट्र परिषदेत एक ठराव मांडला आहे. हा ठराव अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानुसार दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍या देशांवर आर्थिक निर्बंध लादले जावेत, अशी तरतूद करण्याची गरज प्रतिपादित करण्यात आली आहे. या ठरावाला सर्व देशांनी समर्थन दिले पाहिजे. तरच या देशांच्या नाड्या आवळल्या जातील. जागतिक बँक, अमेरिकेसारख्या देशांनीही दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या, पोसणार्‍या देशांना देताना विचार करणे गरजेचे आहे.

शेवटचा मुद्दा म्हणजे, जागतिक महासत्तांसह विविध देशांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर राजकारण करणे थांबवले पाहिजे. आज दहशतवादाच्या २०० हून अधिक व्याख्या आहेत. प्रत्येक देश आपल्या दृष्टीकोनातून दहशतवादाकडे पाहात आहे. जागतिक पातळीवर याबाबत एकवाक्यता नसल्याने दहशतवाद्यांचे ङ्गावते आहे.
श्रीलंकेचे हिंदी महासागरातील स्थान पाहता तिथे जिहादींनी आपला कब्जा केला तर ते दक्षिण पूर्व आशियामध्येही हल्ले करू शकतात, दक्षिण आशियात हल्ले करू शकतात. त्यामुळे श्रीलंकेसह अनेक देशांनी येणार्‍या काळात अत्यंत सतर्क आणि सजग राहण्याची गरज आहे.