पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. यानंतर
कारण पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी आपल्या संवैधानिक अधिकारांचा वापर करत विधानसभा विसर्जित केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकार संपुष्टात आले आहे. याशिवाय राज्यपालांनी पश्चिम बंगालचे मंत्रिमंडळ बरखास्त केले. खरे तर, या विधानसभेचा कार्यकाळ 8 मे 2021 ते 7 मे 2026 पर्यंतच होता. अर्थात नियमानुसारच जुनी विधानसभा भंग करण्यात आली आहे. परिणामी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तेथे सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडल्याची चिन्हे आहेत.
भारतीय संविधानाचे कलम 174 (2)(बी) अंतर्गत मिळणाऱ्या घटनात्मक अधिकारांचा वापर करत राज्यपालांनी मंत्रिमंडळ व सरकार बरखास्त केले आहे. अधिकृत नोटीसमध्ये आर. एन. रवी यांनी याबद्दलची घोषणा केली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीला मोठा पराभव सहन करावा लागला असून भाजपाने बहुमत मिळवले आहे. मात्र या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. यावेळी ममता बॅनर्जी यांनी नैतिकदृष्ट्या टीएमसी जिंकली आहे, तर मी राजीनामा का देऊ? म्हणत मुख्यमंत्री पद सोडण्यास नकार दिला होता.
दरम्यान, 4 मे रोजी जाहीर झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भाजपाने 207 जागा जिंकत बहुमताचा आकडा गाठला आहे, तर तृणमूल काँग्रेसला 80 जागांवर विजय मिळाला आहे.