म्हापसा येथील एका फास्टफूड सेंटरमध्ये जेवणाच्या अवघ्या 160 रुपयांच्या बिलावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. फास्टफूड सेंटरचा मालक आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात अन्साभाट-म्हापसा येथील राजन हळदणकर (60) आणि राहुल हळदणकर (21) पिता-पुत्र गंभीर जखमी झाले.
सदरची घटना गुरुवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास घडली. या प्रकरणी फिर्यादी राजन वामन हळदणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, म्हापसा पोलिसांनी संशयित फास्टफूड सेंटरचा मालक आनंद हजारे, श्रीधर हजारे (दोघे रा. म्हापसा), रोहित रवी रॉय (रा.धुळेर, मूळ पश्चिम बंगाल) आणि एका अज्ञात कामगारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुस्कर, राजन हळदणकर हे आपला मुलगा राहुल याच्यासह गुरुवारी रात्री जेवण्यासाठी एका फास्टफूड सेंटरमध्ये गेले होते. जेवण झाल्यानंतर 160 रुपयांच्या बिलावरून मालक आणि हळदणकर यांच्यात किरकोळ शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रूपांतर नंतर शिविगाळ आणि हाणामारीत झाले.