Home बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवच्या दौऱ्यावर

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला ब्रिटन दौरा आटोपून काल थेट मालदीवमध्ये पोहोचले. राजधानी माले येथे पोहोचताच, राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी त्यांचे विमानतळावर जोरदार स्वागत केले. यावेळी त्यांचे मंत्रिमंडळ देखील विमानतळावर उपस्थित होते. त्यामध्ये मालदीवचे परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि गृह सुरक्षा मंत्र्यांसह इतर मंत्र्यांचा समावेश होता.

राष्ट्रपती मुइझ्झू यांनी पंतप्रधान मोदींना मिठी मारून त्यांचे स्वागत केले. मुइझ्झू यांच्या निमंत्रणावरुनच पंतप्रधान मोदी मालदीवला पोहोचले आहेत. 26 जुलै रोजी होणाऱ्या मालदीवच्या 60 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. या र्षी भारत आणि मालदीवमधील राजनैतिक संबंधांना 60 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुइझ्झू हे भारतासोबतचे आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, भारत आणि मालदीव यांनी शुक्रवारी मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू करण्याची घोषणा केली. मोहम्मद मुइझ्झू यांनी शुक्रवारी नरेंद्र मोदी यांच्यासमवेत माले येथे संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू करण्याची घोषणा केली.