Home Featured जि. पं. निवडणुकीसाठी 3-4 दिवसांत भाजपचे उमेदवार जाहीर : प्रदेशाध्यक्ष

जि. पं. निवडणुकीसाठी 3-4 दिवसांत भाजपचे उमेदवार जाहीर : प्रदेशाध्यक्ष

0

येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी बहुतांश मतदारसंघातील उमेदवारांची एकमताने निवड केली जात आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत उमेदवार जाहीर केले जातील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल दिली. प्रत्येक मतदारसंघात भाजपतर्फे एकमेव उमेदवार असेल याकडे भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उत्तर गोव्यातील 25 जागांवर भाजपच्या उमेदवार निश्चितीसाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष नाईक यांच्या उपस्थितीत काल म्हापशातील पक्ष कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दामू नाईक यांनी माहिती दिली.