Home बातम्या काँग्रेसच्या तीन वरिष्ठ नेत्यांमध्येकेरळमच्या मुख्यमंत्रिपदासाठी चुरस

काँग्रेसच्या तीन वरिष्ठ नेत्यांमध्येकेरळमच्या मुख्यमंत्रिपदासाठी चुरस

0

केरळम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील यूनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला (यूडीए) बहुमत मिळाले आहे. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असून, काँग्रेसच्या तीन वरिष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चुरस वाढली आहे.
केरळचे विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन, माजी विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा रंगली आहे. त्यामुळे या तिघांमधून मुख्यमंत्री निवडण्याचे काँग्रेस नेतृत्वासमोर आव्हान आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाची गुरुवारी बैठक पार पडली. त्या बैठकीत मुख्यमंत्री निवडण्याचे अधिकार काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना देण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे केरळच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आता काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना देण्यात आला आहे.
पर्यवेक्षक मुकुल वासनिक आणि अजय माकन हे काँग्रेस आमदारांची वैयक्तिक भेट घेत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी आमदारांच्या मनात कोण आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या तीन नेत्यांच्या समर्थकांनी देखील पर्यवेक्षकांची भेट घेत आपल्या मनातील नेत्याचे नाव सुचवले आहे. दरम्यान, केरळ विधानसभेच्या एकूण 140 जागांपैकी यूडीएफला 102 जागा मिळाल्या आहेत.