Home बातम्या सांगोल्ड्यातील स्वयंअपघातात तरुण ठार

सांगोल्ड्यातील स्वयंअपघातात तरुण ठार

0

सांगोल्डा बार्देश येथे चोगम रस्त्यावर एका संरक्षक भिंतीला दुचाकीची धडक बसून झालेल्या स्वयंअपघातात विकास रमेश सोलट (24, रा. बारामती, पुणे) हा दुचाकीस्वार तरुण ठार झाला. विकास हा पर्वरीतील कॅसिनोत कामाला होता.
सविस्तर माहितीनुसार, हा अपघात गुरुवारी पहाटे 4.30 च्या सुमारास घडला. विकास हा कामावरून सुटल्यानंतर आपल्या एमएच-42-बीएल-6921 क्रमांकाच्या दुचाकीवरून सांगोल्डा येथे खोलीवर जात होता. वाटेत चोगम रस्त्यावरील वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व विरुद्ध दिशेने जात एका रेस्टॉरंटच्या संरक्षक भिंतीला दुचाकी धडकली. या स्वयंअपघातात त्याचे हेल्मेट संरक्षक भितीला आदळून फुटले आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्वतबंबाळ अवस्थेत त्याला रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.