राजस्थानच्या चुरू येथे काल दुपारी 12.30 वाजता भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले. या दुर्घटनेत विमानातील दोघाही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेनंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसू लागले. हा स्फोट भानोदा गावानजीक घडला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. आग विझवल्यानंतर दोघाही वैमानिकांचे मृतदेह आढळून आले.
जॅग्वार लढाऊ विमानाचा नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान राजस्थानच्या चुरूजवळ अपघात झाला, असे हवाई दलाने म्हटले आहे.