Home बातम्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांवरीलअविश्वास प्रस्ताव फेटाळला

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांवरीलअविश्वास प्रस्ताव फेटाळला

0

काल बुधवारी लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठीचा अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. सभागृहाच्या कामकाजादरम्यान त्यांच्यावर भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या चर्चेनंतर हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला असून, आता ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा अध्यक्षांचे जोरदार समर्थन केले. त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. चर्चा संपल्यानंतर अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. आवाजी मतदानाच्या आधारे लोकसभेने हा प्रस्ताव फेटाळून लावला. यामुळे आता ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. अविश्वास प्रस्तावावर आवाजी मतदानानंतर, पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी आज 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत सभागृह तहकूब करण्याची घोषणा केली. तत्पूर्वी, गृहमंत्री अमित शहा यांनी 56 मिनिटांचे भाषण केले.