Home Featured प्रकाश वेळीप यांचे आरोप निराधार अन्‌‍ खोटे

प्रकाश वेळीप यांचे आरोप निराधार अन्‌‍ खोटे

0

भाजपच्या एसटी मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर यांचा पलटवार

‘उटा’वरील निर्बंधांसाठी अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप यांनी भाजप सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर केलेले सर्व आरोप निराधार आणि खोटे आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून आदिवासी समाजाच्या विकासासाठी भरीव कार्य केले जात आहे, असा दावा भाजपच्या एसटी मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केला.

प्रकाश वेळीप यांचे विधाने निषेधाह आहेत. वेळीप यांनी गोव्यातील लोकांची दिशाभूल करू नये. त्यांनी आरोप करणे सुरुच ठेवले तर त्यांच्याविरोधात निदर्शने केली जाणार आहेत. त्यांना सरकारविरुद्ध बोलायचे असेल तर भक्कम पुरावे आणावेत, असेही प्रभाकर गावकर यांनी सांगितले.

प्रकाश वेळीप यांनी आत्तापर्यंत स्वार्थासाठी एसटी समाजाचा वापर केला. भाजप एसटी मोर्चा तथ्यहीन आरोप सहन करणार नाही. भाजपकडे निष्ठा दाखविण्याचे नाटक करून विधानसभा किंवा जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपशी गद्दारी केलेी. राज्य सरकारने उटा संघटनेवर बंदी घातलेली नाही. आदिवासी समाजातील सहा संघटनानी उटाच्या अध्यक्ष व इतरांच्या विरोधात जिल्हा निबंधकांकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निवाडा देताना निबंधकांनी उटावर निर्बंध घातले आहेत, असेही प्रभाकर गावकर यांनी सांगितले.