विज्ञान, संशोधन आणि राष्ट्रउभारणीमधील असाधारण योगदानाबद्दल प्रख्यात शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते डॉ. रघुनाथ माशेलकर यांना गुरुवार दि. 16 एप्रिल रोजी प्रतिष्ठित ‘गोमंत गौरव सन्मान’ प्रदान केला जाईल. पणजी येथील कला अकादमीमध्ये आयोजित ‘गोवा 2037 : ज्ञान, उद्योग आणि शाश्वतता’ या परिषदेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. या कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी 4 वाजता होईल आणि पुरस्कार वितरण समारंभ सायंकाळी 6 ते 7 या वेळेत संपन्न होईल. ही परिषद गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (जीसीसीआय) आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.