मंगेशी येथील धोकादायक जंक्शनवर शुक्रवारी संध्याकाळी प्रवाशी बस व दूधवाहू टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात एकूण 9 प्रवासी जखमी झाले. जखमींना त्वरित मडकई प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. म्हार्दोळ पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला. मंगेशी येथील धोकादायक जंक्शनवर हा अपघात घडला. त्यात बसमधील 8 जण जखमी झाले, तसेच टेम्पोचालक सुद्धा जखमी झाला. सर्व जखमींना 108 रुग्णवाहिकेतून मडकई प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अपघातानंतर फोंडा ते पणजी मार्गावरील वाहतुकीवर परिणाम दिसून आला. फोंडा वाहतूक पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. म्हार्दोळ पोलीसांनी निरीक्षक योगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पंचनामा केला.