फोंडकेवाडो-पर्रा, बार्देश येथे ओडिशातील एका कामगाराच्या खून प्रकरणी म्हापसा पोलिसांनी अटक केलेल्या पिता-पुत्राला काल म्हापसा न्यायालयात उभे केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सत्या नबरंगपुरा (50) व थाबिर नबरंगपुरा (31) अशी या अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.