Home बातम्या अनुसूचित जमातीतील लोकांनाराजकीय आरक्षण मिळवून द्या

अनुसूचित जमातीतील लोकांनाराजकीय आरक्षण मिळवून द्या

0

मुख्यमंत्र्यांना तवडकरांकडून निवेदन सादर

राज्यातील अनुसूचित जमातीतील लोकांना गोवा विधानसभेत पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर व इतरांनी केली. या संदर्भात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना एक निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मंत्री तवडकर यांच्यासोबत सभापती गणेश गांवकर, आमदार गोविंद गावडे तसेच ‘उटा’चे नेते व माजी मंत्री प्रकाश वेळीप, माजी आमदार वासू मेंग गांवकर उपस्थित होते. तत्पूर्वी भाजप प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन सादर केले.

त्यासाठीचे विधेयक संसदेत संमत झालेले असून राष्ट्रपतींनीही या विधेयकाला संमती दिलेली आहे. त्यामुळे आता पुढील प्रक्रिया पूर्ण करुन त्यासाठीची अधिसूचना काढण्साठीची पावले उचलली जावीत अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. सावंत व दामू नाईक यांच्याकडे केली. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी अशी सूचनाही नेत्यांनी केली.