Home बातम्या सहा वर्षांनी राज ठाकरे मातोश्रीवर

सहा वर्षांनी राज ठाकरे मातोश्रीवर

0

काल रविवारी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जात भेट घेतली. शिवसेना ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा काल 65 वा वाढदिवस होता. उद्धव ठाकरेंना त्यांचे बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट ‘मातोश्री’ निवासस्थानावर जात भेट घेत शुभेच्छा दिल्या.
मराठी भाषेसाठी एकत्र आलेले बंधू काल पुन्हा एकत्र दिसले. राज ठाकरे याआधी त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आले होते. त्यानंतर थेट ते सहा वर्षांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला आल्याने याची जोरदार चर्चा रंगली
आहे.
मातोश्रीवर दोघांमध्ये काही मिनिटे गप्पाही झाल्या. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यावर राज ठाकरेंनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीचे दर्शन घेतले.