Home बातम्या संशयित महंमद नाझीरगोवा पोलिसांच्या ताब्यात

संशयित महंमद नाझीरगोवा पोलिसांच्या ताब्यात

0

राज्यातील म्हापसा आणि दोनापावल येथील दरोडा प्रकरणातील सहावा संशयित आरोपी महंमद नाझीर (बांगलादेश) याला गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हा विभागाने एका कारवाईत सहा बांगलादेशी दरोडेखोरांना काही दिवसापूर्वी अटक केलेली होती. त्या सहा संशयित दरोडेखोरांचा गोव्यातील दोन दरोडा प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. गोवा पोलिसांच्या गुन्हा विभागाने राज्यातील दोन्ही दरोडा प्रकरणातील संशयित पाच बांगलादेशी दरोडेखोरांना दिल्लीतून काही दिवसापूर्वी आणले आहेत. तर, सहाव्या आरोपीला काही कारणास्तव गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. गोवा पोलिसांनी संशयित सहावा आरोपी महंमद नाझीर याला हस्तांतरण वॉरंटवर गोव्यात आणला आहे.