राज्यात ४ लाख सदस्य नोंदणीचे भाजपचे उद्दिष्ट

0
114

>> मोहिमेचा ताळगाव येथे शुभारंभ

>> प्रत्यक्ष नोंदणीला ६ जुलैपासून सुरूवात

भाजपच्या राज्य पातळीवरील सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ ताळगाव येथे एका समारंभात काल करण्यात आला असून राज्यात सुमारे ४ लाख सदस्यांची नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्यक्ष सदस्य नोंदणीला ६ जुलैपासून सुरूवात होणार आहे.

या सदस्य नोंदणी मोहिमेच्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे मंत्री, आमदार, भाजपचे पदाधिकारी व इतरांची उपस्थिती होती.
भाजपच्या राज्य पातळीवरील सदस्य नोंदणी मोहिमेच्या प्रमुखपदी राज्य सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या सदस्य नोंदणी शुभारंभ कार्यक्रमात प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर व इतरांची यावेळी मार्गदर्शनपर भाषणे झाली.

भाजपच्या संघटनात्मक निवडणुका आगामी दोन महिन्यांच्या काळात घेतल्या जाणार आहेत. संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप सदस्य नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही सदस्य नोंदणी मोहीम पूर्ण झाल्यानंतर भाजपच्या मतदान केंद्र, मतदारसंघ समिती, जिल्हा समिती व राज्य समितीची निवड केली जाणार आहे.