राजस्थानमधील पक्षांतर केलेल्या आमदारांना न्यायालयाची नोटीस

0
161

राजस्थान विधानसभा अध्यक्ष, बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार्‍या आणि नंतर पक्षांतर करत कॉंग्रेसमध्ये गेलेल्या सहा आमदारांना राजस्थान उच्च न्यायालयाने गुरुवारी नोटिसा जारी केल्या. या आमदारांनी कॉंग्रेसमध्ये पक्षांतर करण्याविरुद्ध बसपने, तसेच भाजप आमदार मदन दिलावर यांनी केो
बसप आमदारांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार भाजपचे आमदार मदन दिलावर यांनी अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे केली होती. ती नाकारण्याच्या अध्यक्षांच्या २४ जुलैच्या आदेशालाही त्यांनी याचिकेत आव्हान दिले आहे.

या याचिकांची सुनावणी केल्यानंतर न्या. महेंद्रकुमार गोयल यांनी नोटिसा जारी केल्या. संदीप यादव, वाजिब अली, दीपचंद खेरिया, लखन मीणा, जोगेंद्र आवाना व राजेंद्र गुढा यांनी २०१८ च्या निवडणुका बसपचे उमेदवार म्हणून जिंकल्या होत्या.

सप्टेंबर २०१९ मध्ये हा संपूर्ण गट कॉंग्रेसमध्ये विलीन झाला. यामुळे २०० सदस्यांच्या विधानसभेत सत्ताधारी कॉंग्रेसचे संख्याबळ १०७ वर पोहोचून अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. दरम्यान, राजस्थानच्या सत्तारूढ कॉंग्रेस पक्षातील फूट टाळण्यासाठी पक्षाच्या आमदारांना गेल्या १५ दिवसांपासून एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले असून त्यांना राजस्थान विधानसभेच्या अधिवेशनापर्यंत म्हणजे १४ ऑगस्टपर्यंत तेथेच ठेवण्यात येणार आहे, असे कॉंग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर सांगितले. दरम्यान, मुक्यमंत्री गेहलोत यांनी, राजस्थान विधानसभेचे अधिवेशन १४ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर घोडेबाजार तेजीत असल्याचा दावा केला.