Home बातम्या मृतदेह स्वीकारण्यास अग्निशामक दलाच्या जवानाच्या पत्नीचा नकार

मृतदेह स्वीकारण्यास अग्निशामक दलाच्या जवानाच्या पत्नीचा नकार

0

येथील एका २२ मजली इमारतीला लागलेल्या आग दुर्घटनेत मरण पावलेल्या अग्निशामक दलाच्या जवानाच्या कुटुंबियांनी सरकारकडून नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे.
शुक्रवारच्या सदर दुर्घटनेत अग्नीशामक दलाचा जवान नीतिन इंगलेकर हा आग विझविताना मरण पावला होता. इंगलेकर याच्या पत्नीने आपल्या पतीच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळण्याबाबत सरकारकडून लेखी आश्‍वासन मिळाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.