Home Featured बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी होणार जाहीर

बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी होणार जाहीर

0

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी 2026 मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवार दि. 21 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता जाहीर केला जाणार आहे.

शिक्षण मंडळाने 10 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2026 या काळात राज्यातील 20 परीक्षा केंद्रांतून बारावीची परीक्षा घेतली होती. या परीक्षेला एकूण 17,283 विद्यार्थी बसले होते. त्यात 8203 मुले आणि 9080 मुलींचा समावेश होता. तसेच, अन्य काही गटांतील 2149 विद्यार्थ्यांचा समावेश होता. राज्यातील 34 उच्च माध्यमिक विद्यालयांनी 1282 विद्यार्थ्यांना एनएसक्यूएफ विषयाची सुविधा उपलब्ध केली होती.

बारावीच्या परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांच्या वितरणाची तारीख निकालानंतर जाहीर केली जाणार आहे.