काल रविवारी रशियाच्या पॅसिफिक किनाऱ्याला भूकंपांनी जोरदार तडाखा दिला. या दरम्यान अनेक भूकंप झाले आणि रशियाला त्सुनामीचा इशारा देण्यात आला. पेट्रोपाव्लोव्स्क – कामचत्स्कीजवळ 7.4 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला. रशियाच्या पूर्वेकडील कामचत्स्कीजवळच्या भागात 6.6 तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसने ही माहिती दिली. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून फक्त 10 किलोमीटर खाली होते. त्यामुळे भूकंपाचा प्रभाव जास्त जाणवला. भूकंप उथळ असल्याने मोठे नुकसान झाले नसावे. पण, लोकांना जोरदार धक्के जाणवले. पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने कामचत्स्कीसाठी त्सुनामीचा इशारा दिला आहे. या भूकंपामुळे त्सुनामी निर्माण झाली असावी. दुसरीकडे, पॅसिफिक महासागरात असलेला तुवालु नावाचा लहानसा देश हवामान बदलाच्या भयंकर परिणामांना सामोरा जात आहे. या देशाची सगळी लोकसंख्या पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे 16 जूनपासून सुरु झालेल्या व्हिसा अर्जासाठी 5 हजार 157 जणांनी धाव घेतली. या सगळ्यांनी ऑस्ट्रेलियन सरकारकडे आसरा मागितला आहे.