दंगल.. क्रिकेटची अन् वादांची

0
260
  • नितीन कुलकर्णी
  • क्रीडा अभ्यासक

बहुतांशी क्रीडास्पर्धांमध्ये वादविवाद ठरलेले असतात. बरेचदा अनाठायी वादातून किंवा खेळाडूंच्या असभ्य वर्तनाने देशाची, संघाची बदनामी होते. हे टाळण्यासाठी स्पर्धेत खिलाडूवृत्ती आवश्यक असते. प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणे हे विजयासाठीची रणनीती म्हणून योग्य असले तरी ते करत असताना उन्माद नसावा. क्रिकेटच्या विश्‍वचषक स्पर्धांना बहुतांश वेळा वादाची झालर राहिली आहे. चुरशीइतकेच या स्पर्धांतील वाद चर्चिले गेले आहेत. ताज्या विश्‍वचषक स्पर्धांच्या निमित्ताने या वादांचा धांडोळा…

इंग्लंडच्या भूमीत विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेला शानदार प्रारंभ झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते विश्‍वचषकाची वाट पाहत होते. विशेषतः भारतात निवडणुकीचा धुराळा आता खाली बसला असून मैदानातील खरी जंग पाहण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून येत्या महिना-दीड महिना क्रिकेटची दंगल पाहावयास मिळेल. विश्‍वचषक जिंकण्यासाठी सर्वच संघ जीव तोडून मेहनत करतील. या दरम्यान विक्रमांची नोंद होईल आणि किरकोळ कारणांवरून वादही होतील. जावेद मियॉंदादचा ङ्ग्रॉग जम्प असो किंवा उपांत्य ङ्गेरीतील पराभवाचे ढग दिसू लागताच मैदानावर कोलकतावासीयांनी केलेली बाटलीङ्गेक असो, या बाबी विश्‍वचषकाच्या खिलाडूवृत्तीला गालबोट लावणार्‍या ठरल्या. याशिवाय नवीन कीर्तिमानही रचण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेहमीप्रमाणे याही वेळेस सर्वाधिक बळी, सर्वाधिक शतकं, धावा काढणार्‍या खेळाडूंचा बोलबाला राहील.

बहुतांशी मोठ्या स्पर्धेत वादविवाद होतातच. त्यात नवनवीन विक्रम होतात. विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतही विक्रमांचा इतिहास घडेल, असे तज्ज्ञ सांगतात. विश्‍वचषक सामने उत्कंठावर्धक असतात, हे खरे, पण त्यापेक्षाही वाददेखील तितकेच लक्षवेधी ठरतात. अनाठायी वादातून किंवा खेळाडूंच्या असभ्य वर्तनाने देशाची, संघाची बदनामी होते. नोंदविलेल्या विक्रमावर काही वेळा आक्षेप घेतला जातो. मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही खेळाडूने शिस्त पाळणे अपेक्षित असते. म्हणूनच वादाच्या गोष्टी टाळल्या तर स्पर्धेत खिलाडूवृत्ती कायम राहील.

वादामागे अनेक कारणे –
२००३ची विश्‍वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच चर्चेत आली होती. कारण अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे आढळून आल्याने ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर शेन वॉर्नला दक्षिण आङ्ग्रिकेतून केवळ परत पाठवले नाही तर त्यावर एक वर्षासाठी खेळण्यावर बंदी घातली होती. वॉर्नच्या रक्तात बंदी घातलेला अंमली पदार्थ मोडूरेटिक आढळून आले होते. २००३ मध्येच झिम्बाब्वेचे खेळाडू अँडी फ्लॉवर आणि हेन्री ओलंगा यांनी झिम्बाम्बे सरकारचा विरोध करण्यासाठी काळी पट्टी बांधून खेळणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केलेे. झिम्बाब्वेचे तत्कालिन अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात होता. त्यानुसार झिम्बाब्वेचे खेळाडू मैदानावर काळ्या पट्‌ट्या बांधूनच उतरले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मुगाबे यांच्या अत्याचाराची दखल घेतली जावी, हा यामागचा उद्देश होता. या धाडसाबद्धल जागतिक स्तरावर कौतुक झाले, मात्र झिम्बाब्वेमध्ये विपरित परिणाम झाला. विश्‍वचषक संपल्यानंतर या दोघांना निवृत्तीचा मार्ग पत्करावा लागला.

खेळाडूंवर बंदीची कारवाई –
२००७ च्या विश्‍वचषकात पाकिस्तान साखळी स्पर्धेतच गारद झाले होते. पाकिस्तानच्या खेळाडूंना पराभवाचा जबर मानसिक धक्का बसला. यादरम्यान पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा संशयास्पद मृत्यू झाला. परिणामी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेऐवजी सर्व लक्ष वूल्मरच्या गूढ मृत्यूकडेच लागले. २००७ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्‍वचषक स्पर्धेत अँड्‌—यू फ्लिटंॉप हा चुकीच्या कारणांमुळे वर्तमानपत्रातून चर्चेत राहिला. पहिल्याच डावात जेव्हा इंग्लंड श्रीलंकेकडून पराभूत झाला तेव्हा फ्लिटंॉप हा मद्यधूंद अवस्थेत सेंट लुसिया येथे बोटीतून पडला. या गैरवर्तनामुळे फ्लिटंॉपला उपकर्णधारपदावरून हटविले आणि एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली. याचाच अर्थ स्पर्धेदरम्यानही खेळाडूंवर कोणत्या ना कोणत्या कारणावरून बंदीची कारवाई सुरूच होती, हे दिसते.

पराभव-विजयाची उलटीगंगा –
१९९६मध्ये सुरक्षेच्या कारणावरून ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने श्रीलंकेत न खेळता पराभव मान्य केला होता. त्यावेळी विश्‍वचषकाचा ङ्गॉर्मेट असा होता की, दोन गूण गमावूनही ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पोचली होती. मात्र लाहोरमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने आपल्या अपमानाचा बदला घेतला आणि अरविंद डिसिल्वाच्या दमदार शतकाच्या जोरावर विश्‍वषचकावर नाव कोरले. १९९६ मध्येही आणखी एक वाद निर्माण झाला होता. इडन गार्डनमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात उपांत्य सामना झाला. २६२ धावांचा पाठलाग करताना सचिन असेपर्यंत भारताची स्थिती चांगली होती. मात्र तो ६५ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर भारताचे गडी एकामागून एक तंबूत परतू लागले. त्यानुसार भारताची अवस्था ८ बाद १२० झाली. संघाचा पराभव होत असल्याचे पाहून श्रोत्यांनी मैदानावर बाटल्या ङ्गेकण्यास सुरवात केली. स्टेडियममध्ये असलेल्या आसनांनादेखील श्रोत्यांनी आग लावली. भारतीय चाहत्यांचा संताप पाहून पंचाने सामना सुरू ठेवण्यास नकार दिला आणि श्रीलंकेला विजयी घोषित केले. यावेळी खेळपट्टीवर असलेल्या विनोद कांबळीला रडू कोसळले. अर्थात तो पराभव मान्य करण्यास तयार नव्हता.

नशिबाने थट्टा मांडली –
१९९२मध्ये दक्षिण आङ्ग्रिकेने पहिला विश्‍वचषक सामना खेळला. उपांत्य ङ्गेरीत त्याचा मुकाबला इंग्लंडशी होता. जिंकण्यासाठी आङ्ग्रिकेला १३ चेंडूत २२ धावा करायच्या होत्या. हे आव्हान ङ्गार कठिण नव्हते. मात्र त्याचवेळी पाऊस आला. पाऊस थांबल्यानंतर जेव्हा खेळाडू मैदानात उतरले तेव्हा एक चेंडू २२ धावा असे समीकरण समोर आलेे. ब्रेन मॅकमिलनने शेवटचा चेंडू प्लेड केला आणि एक धाव काढली. आङ्ग्रिकेच्या खेळाडूंनी संतापाच्या भरात मैदान सोडले. अशा रितीने त्याचा दुर्दैवी शेवट झाला. दक्षिण आङ्ग्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए आणि प्रशिक्षक बॉब वूल्मर या जोडीने आगामी विश्‍वचषकात आणखी जोमात उतरण्याचे ठरविले आणि त्यांनी प्रयत्न सुरू केले. दोघांनी १९९९च्या विश्‍वचषकात तंत्रज्ञानाचा वापर करत एक पाऊल पुढे टाकले. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात क्रोनिए हा मैदानावर इअर पीससमवेत दिसला. तो इअर पीसच्या मदतीने ड्रेसिंग रुममध्ये असलेल्या बॉब वूल्मरकडून सूचना घेत होता. डावाची सुरवात करणार्‍या सौरभ गांगुलीने हा प्रकार पाहिला आणि पंचाला ती गोष्ट निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पंचाने क्रोनिएला इअर पिस काढायला लावले. अर्थात तांत्रिकदृष्ट्या ही कृती नियमाविरुद्ध नव्हती.

धावांची बरसात –
विश्‍वचषक स्पर्धेत ७०० धावा काढणारा न्यूझीलंडचा ब्रॅडन मॅकमिलनचा सर्वांत चांगला स्ट्राइक रेट मानला जातो. त्याने २७ डावात १२०.८४ गतीने धावा काढल्या. एकाच डावातही त्याचा स्ट्राईक रेट सर्वाधिक चांगला राहिला आहे. २०१५ मध्ये वेलिंग्टन येथे त्याने ३०८च्या स्ट्राइक रेटने इंग्लंडविरुद्ध २५ चेंडूत ७७ धावा काढल्या. त्याने १८ चेंडूत ५० धावा काढल्या होत्या. सर्वात कमी चेंडूत (५०) शतक झळकावण्याचा मान आयर्लंडचा खेळाडू केव्हिन ओब्रायनच्या नावावर आहे. २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध बंगळूर येथील सामन्यात त्याने ६३ चेंडूत ११३ धावा केल्या होत्या. दक्षिण आङ्ग्रिकेचा एबी डिव्हिलर्सने २०१५ मध्ये सिडनीत वेस्ट इंडिजविरुद्ध ६४ चेंडूत १६२ धावा केल्या होत्या. सर्वाधिक स्ट्राइक रेटदेखील दक्षिण आङ्ग्रिकेच्याच नावावर आहे.
एबी डिव्हिलर्सच्या नावावर चांगल्या ङ्गलंदाजीची सरासरी (७०० धावा) आहे. त्याने चार शतकं, ६ अर्धशतकांबरोबरच ६३.५२ च्या सरासरीने १२०७ धावा केल्या आहेत. हे सर्व विक्रम या विश्‍वचषकात मोडू शकतात. कारण इंग्लंडची खेळपट्टी सपाट असून त्यामुळे अधिक धावसंख्येचे सामने होऊ शकतात. गेल्यावर्षी ब्रिस्टलमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५० षटकात सहा विकेट गमावून ४८१ धावा केल्या होत्या. ही धावसंख्या एक दिवसीय सामन्यातील उच्चांक मानला जातो. हे पाहता इंग्लड क्रिकेट मंडळाने ५०० धावांचा स्कोअरबोर्ड तयार केला आहे. यापूर्वी ४०० धावांचा स्कोरबोर्ड केला जात असे.