कुचेली म्हापसा येथील राज्य सरकारने संपादित केलेल्या कोमुनिदाद जागेतील जमिनीचे भूखंड पाडून ते कायदेशीररित्या नावावर करून देतो असे सांगून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणी राजा अँथनी, सुमित फडते व राजू मांद्रेकर यांना काल अटक केली.
फसवणुकीचा हा प्रकार गेल्या वर्षी घडला होता. या प्रकरणी आता फिर्यादी रिंकी झा (रा. कुचेली) व इतरांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर म्हापसा पोलिसांनी कारवाई करीत वरील तिघाही संशयितांना अटक केली.
जमीन देण्याच्या नावाखाली संशयितांनी फिर्यादींकडून 9 लाख 75 हजार रुपये घेतले होते. मात्र, संशयितांनी ही जागा फिर्यादींच्या नावे करून दिली नाही.
मध्यंतरी याच जागेतील राज्य प्रशासनाने कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण करून उभारलेली बेकायदा 36 बांधकामे जमीनदोस्त केली होती. ही जागा सरकारने स्थानिक कोमुनिदादकडून स्मशानभूमी बांधण्यासाठी संपादित
केली होती.