अखिल भारतीय केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनने आज (दि. 20 मे) जाहीर केलेल्या देशव्यापी संपात गोव्यातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सहभागी होणार असून, गोव्यातील सर्व औषधालये बंद ठेवली जाणार आहेत. केवळ, हॉस्पिटलमधील औषधालये खुली ठेवण्यात येणार आहेत. औषधांची ऑनलाईन विक्री, कथित अन्यायकारक व्यापारी पद्धती आणि लहान विक्रेत्यांवर ई-फार्मसीचा वाढता विपरित प्रभाव याविरोधात देशव्यापी औषधालय बंद ठेवली जाणार आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे दिली जाणारी मोठी सूट, ऑफलाईन विक्रेत्यांसाठी बाजारातील असमान परिस्थिती आणि योग्य प्रिस्क्रिप्शनच्या पडताळणीशिवाय औषधांची कथित विक्री यांसारख्या समस्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधणे हा या संपाचा उद्देश आहे, असे संघटनेने म्हटले आहे.