इंग्लंडचा आयर्लंडवर ६ गड्यांनी विजय

0
150

>> सॅम बिलिंग्सचे अर्धशतक; डेव्हिड विलीचे पाच बळी

यजमान इंग्लंडने गुरुवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा ६ गडी व १३३ चेंडू राखून पराभव केला. आयर्लंडने विजयासाठी ठेवलेले १७३ धावांचे माफक लक्ष्य इंग्लंडने २७.५ षटकांत ४ गडी गमावून गाठले. इंग्लंडकडून डावखुरा मध्यमगती गोलंदाज डेव्हिड विली याने ३० धावांत ५ गडी बाद करत कारकिर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन केले. फलंदाजी विभागात इंग्लंडकडून सॅम बिलिंग्स याने चमक दाखवताना ५४ चेंडूंत ११ चौकारांसह नाबाद ६७ झावा करताना कर्णधार ऑईन मॉर्गन याच्यासह पाचव्या गड्यासाठी अविभक्त ९६ धावांची भागीदारी केली. या विजयासह इंग्लंडने वर्ल्डकप सुपर लीगमध्ये १० गुणांची कमाई केली. मालिकेतील दुसरा सामना आज शनिवारी खेळवला जाणार आहे.

धावफलक
आयर्लंड ः पॉल स्टर्लिंग झे. मॉर्गन गो. विली २, गॅरेथ डेलानी झे. बँटन गो. विली २२, अँडी बालबिर्नी झे. बॅअरस्टोव गो. विली ३, हॅरी टेक्टर त्रि. गो. मेहमूद ०, केव्हिन ओब्रायन झे. विली गो. राशिद २२, लोर्कान टकर पायचीत गो. विली ०, कर्टिस कँफर नाबाद ५९, सिमी सिंग धावबाद ०, अँडी मॅकब्रायन झे. बिलिंग्स गो. करन ४०, बॅरी मॅकार्थी झे. व्हिन्स गो. मेहमूद ३, क्रेग यंग झे. रॉय गो. विली ११, अवांतर १०, एकूण ४४.४ षटकांत सर्वबाद १७२
गोलंदाजी ः डेव्हिड विली ८.४-२-३०-५, साकिब मेहमूद ९-१-३६-२, आदिल रशीद १०-३-२६-१, टॉम करन ७-०-३७-१, मोईन अली १०-०-३७-०
इंग्लंड ः जेसन रॉय पायचीत गो. यंग २४, जॉनी बॅअरस्टोव पायचीत गो. मॅकब्रायन २, जेम्स व्हिन्स झे. टकर गो. यंग २५, टॉम बँटन झे. टकर गो. कँफर ११, सॅम बिलिंग्स नाबाद ६७, ऑईन मॉर्गन नाबाद ३६, अवांतर ९, एकूण २७.५ षटकांत ४ बाद १७४
गोलंदाजी ः बॅरी मॅकार्थी ०.५-०-३-०, पॉल स्टर्लिंग ०.१-०-१-०, क्रेग यंग ८-०-५६-२, अँडी मॅकब्रायन ८-०-४७-१, कर्टिस कँफर ५-०-२६-१, सिमी सिंग ३.५-०-२३-०, गॅरेथ डेलानी २-०-१२-०