वॉशिंग्टनमधील सर्वात हायप्रोफाईल अमेरिकी लष्करी तळावर संशयास्पद ड्रोनने घिरट्या घातल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. वॉशिंग्टन पोस्टनुसार, परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि संरक्षण सचिव पीट हेगसेथ हे फोर्ट लेस्ली मॅकनेअर या लष्करी तळावर वास्तव्यास आहेत. या प्रकरणाशी संबंधित तीन व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार या ड्रोनची अद्याप ओळख पटलेली नाही आणि ते कुठून आले हे अस्पष्ट आहे. परिणामी, लष्कर संभाव्य धोक्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. गेल्या 10 दिवसांत फोर्ट लेस्ली मॅकनेअरवर रात्रीच्या वेळी अनेक ड्रोन दिसले, ज्यामुळे सुरक्षा वाढवली आणि तातडीची बैठक बोलावण्यात आली