Home Featured विकसित भारतासाठी युवांनीसक्रिय व्हावे ः सभापती बिर्ला

विकसित भारतासाठी युवांनीसक्रिय व्हावे ः सभापती बिर्ला

0

कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनची परिषद सुरू

2047 सालापर्यंत भारत देश विकसित करण्याचे उद्दिष्ट जर साध्य करायचे असेल तर युवा नेत्यांना सक्रीयपणे काम करावे लागणार आहे. त्याकामी तरुण आमदारांची भूमिका ही फार महत्त्वाची ठरणार आहे, असे उद्गार काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी काढले. येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या विभाग-7च्या परिषदेचे काल उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती गणेश गावकर, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

भारताच्या विकासासाठी विकसित विधानसभाच हातभार लावू शकते, असे स्पष्ट करून सभापती बिर्ला यांनी आमदारांनी नैतिकतेचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. लोकप्रतिनिधींनी केवळ कायदे तयार करण्याचे कामच न करता राज्याचा समतोल व शाश्वत विकासासाठी कर्तव्य पार पाडावे, अशी हाकही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी लोकसभा सभापतींच्या विरोधातील अविश्वास ठरावाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की दीर्घ चर्चेनंतर हा ठराव फेटाळण्यात आला. लोकसभा सभापती हे निष्पक्ष असे रक्षक असल्याचे सिद्ध झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

व्यापार, पायाभूत सुविधा तसेच किनारी व्यवस्थापन यात वाढ घडवून आणण्याच्या कामी गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांनी एकत्र काम करण्याची व्यक्त केली.