Home बातम्या महापौरपदी रोहित मोन्सेरात;वसंत आगशीकर उपमहापौर

महापौरपदी रोहित मोन्सेरात;वसंत आगशीकर उपमहापौर

0

अपेक्षेप्रमाणेच काल रोहित मोन्सेरात यांची पुन्हा एकदा पणजी महापालिकेच्या महापौरपदी निवड झाली, तर उपमहापौरपदी वसंत आगशीकर यांची निवड झाली. महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांवर अनुक्रमे रोहित मोन्सेरात व वसंत आगशीकर यांची बिनविरोध निवड झाली.

तद्नंतर झालेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना महापौर रोहित मोन्सेरात यांनी निवडणुकीच्या वेळी पणजीतील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. पणजीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, पणजी महापालिकेने नव्याने डांबरीकरण केलेले रस्ते पणजीतील घरांना स्वयंपाकासाठीच्या नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्यास वाहिन्या घालण्यासाठी रस्ते खोदू देण्यास त्यांनी स्पष्ट नकार दर्शविला.

महापौर रोहित मोन्सेरात व उपमहापौर वसंत आगशीकर यांचे काल भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी नाईक यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.