कदंबच्या खास बससेवेचा n५० हजार प्रवाशांना लाभ

0

गणेश चतुर्थीनिमित्त अतिरिक्त गाड्या

चतुर्थीनिमित्त कदंब महामंडळात गोवा ते पुणे, कारवार, बेळगांव, कोल्हापूर व सावंतवाडी येथे जाण्यासाठी घातलेल्या अतिरिक्त कदंब बसेसच्या सुमारे ५० हजार प्रवाशांनी १२ रोजीपर्यंत लाभ घेतल्याचे कदंब महामंडळाचे चेअरमन कार्लुस आल्मेदा यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आज १३ रोजीपर्यंत या अतिरिक्त बसेस चालू राहणार असल्याचे ते म्हणाले. गोव्याहून आपल्या मूळ गावी जाणार्‍या लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी कदंब महामंडळाने गोव्यातून वरील शहरात जाण्यासाठी अतिरिक्त बसेस् गेल्या ८ रोजीपासून सुरू केल्या होत्या.

आपापल्या गावी जाणार्‍या लोकांकडून खासगी बसवाले दामदुप्पट तिकीटा दर आकारात असल्याच्या लोकांच्या तक्रारी होत्या. ही तक्रार लक्षात घेऊन कदंबने या लोकांसाठी अतिरिक्त बसगाड्यांची सोय केली होती. मात्र, तिकिट दरात कदंबने कोणतीही वाढ केली नव्हती. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाल्याचे आल्मेदा यांनी सांगितले.