Home Featured सरकारी प्राथमिक शाळांतीलमुलांना गणवेशासाठी अर्थसहाय्य

सरकारी प्राथमिक शाळांतीलमुलांना गणवेशासाठी अर्थसहाय्य

0

राज्यातील सरकारी प्राथमिक विद्यालयांत पहिली आणि तिसरीच्या इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि रेनकोट खरेदीसाठी प्रत्येकी 1,100 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. राज्यातील सुमारे 8200 विद्यार्थ्यांना ही आर्थिक मदत केली जाणार आहे. ही आर्थिक मदत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे.
शिक्षण संचालनालयाने यासंबंधीचे एक परिपत्रक जारी केले आहे. सरकारी प्राथमिक विद्यालयातील इयत्ता पहिली आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांना रेनकोट खरेदीसाठी 500 रुपये आणि शालेय गणवेशासाठी 600 रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे. शिक्षण संचालनालयाने सर्व भाग शिक्षणाधिकारी आणि सरकारी प्राथमिक शाळांच्या प्रमुखांना येत्या 15 जुलै रोजी किंवा त्यापूर्वी निधीची पडताळणी आणि वितरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.