बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल विधान परिषद सदस्य (एमएलसी) पदाचा राजीनामा दिला. 2005 मध्ये बिहारमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर, नितीश कुमार सलगपणे विधान परिषदेचे सदस्य राहिले होते. नितीश कुमार हे नुकतेच राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे नियमांनुसार त्यांना आमदारकी सोडणे आवश्यक होते. विशेष म्हणजे, राजीनामा देऊनही ते पुढील काही दिवस मुख्यमंत्री पदावर कायम राहणार आहेत. अशा परिस्थितीत, बिहारचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितीश कुमार पुढील काही दिवसांत मुख्यमंत्री पदाचाही राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.