सत्ताधारी, विरोधकांकडून अधिवेशनाची रणनीती

0
3

>> 21 जुलैपासून 15 दिवसांचे पावसाळी अधिवेशन

>> विरोधकांच्या बैठकीस सरदेसाई, बोरकर अनुपस्थित

गोवा विधानसभेच्या येत्या 21 जुलै 2025 पासून प्रारंभ होणाऱ्या पंधरा दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी गटाने काल वेगवेगळ्या बैठका घेऊन पावसाळी अधिवेशनाची रणनीती निश्चित केली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षातील आमदारांच्या बैठकीला गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि आरजीपीचे वीरेश बोरकर अनुपस्थित होते.

राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि घटक पक्षाच्या आमदारांची बैठक एका हॉटेलमध्ये घेण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या बैठकीला राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, भाजप आमदार, अपक्ष आमदारांनी उपस्थिती लावली. या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनातील कामकाजावर चर्चा करण्यात आली. बैठकीत आमदारांना प्रश्नांबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. भाजपच्या मंत्र्यांनी अधिवेशनात सादर केलेल्या विधेयकाबाबत माहिती दिली.

पूर्वतयारासाठी बैठक ः मुख्यमंत्री
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक घेण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. या बैठकीमध्ये विधानसभेच्या कामकाजावर चर्चा करण्यात आली. बैठकीत धोरणात्मक निर्णयाबाबत माहिती देण्यात आली. प्रश्न, खासगी विधेयके सादर करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने त्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर बाहेरगावी असल्याने उपस्थित राहू शकले नाही. अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आंतोन वाझ यांची उपस्थिती होती, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
राज्यपालांच्या अभिभाषणावर तीन दिवस चर्चा यापूर्वी झालेली आहे. त्यामुळे आता, पंधरा दिवसांचे अधिवेशन घेतले जात आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

सरदेसाई, बोरकर अनुपस्थित
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पावसाळी अधिवेशनावर विचारविनिमय करण्यासाठी विरोधी पक्षातील आमदारांची एक बैठक पर्वरी येथील आपल्या कार्यालयात बैठक घेऊन अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा काल केली. या बैठकीला काँग्रेसचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, आल्टन डिकॉस्टा, आम आदमीचे आमदार वेंन्झी व्हीएगश, क्रुझ सिल्वा यांची उपस्थिती होती. तर, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई आणि आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर अनुपस्थिती होते.
विरोधी गटातील सर्व आमदारांची एकजूट कायम राखण्यासाठी बैठक आयोजित केली होती. सर्व विरोधी गटातील आमदारांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. या ठिकाणी कुठल्याही हेव्यादाव्याचा प्रश्न येत नाही. सर्व विरोधी आमदारांनी एकत्र राहून आवाज उठविणे गरजेचे आहे, असे विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी सांगितले. गोव्यातील नागरिकांच्या हिताच्या मुद्यांचा पाठपुरावा करण्यासाठी विरोधी गटातील आमदारांची एकजूट आवश्यक आहे, असे आपचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी सांगितले.

बैठकीस सभापतींची उपस्थिती कशी? ः सरदेसाई
भाजपच्या विधानसभा अधिवेशन रणनीती बैठकीत सभापती रमेश तवडकर यांची उपस्थिती कशी? असा प्रश्न गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांनी काल उपस्थित केला.
भाजपने अधिवेशनाची रणनीती आखण्यासाठी पणजीतील एका हॉटेलमध्ये आयोजित बैठकीत सभापती रमेश तवडकर सहभागी झाल्याच्या वृत्तानंतर आमदार सरदेसाई यांनी सभापती तवडकर यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्यावर पक्षपाती पद्धतीने वागण्याचा आणि सभापती कार्यालयाच्या तटस्थतेशी तडजोड करण्याचा आरोप केला आहे. भाजपच्या बैठकीत सभापतींची उपस्थिती त्यांच्या निष्पक्षतेबद्दल गंभीर चिंता निर्माण करते, असे आमदार सरदेसाई यांनी म्हटले आहे.

राज्य विधानसभा अधिवेशन काळात जमावबंदीचा आदेश
पणजी (पत्रक) : उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी 21 जुलै 2025 रोजी सुरू होणाऱ्या राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशन सत्र काळात पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पाच्या सभोवतालच्या 500 मीटर भागात आणि पणजी पोलीस स्थानकाच्या क्षेत्रातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, गल्ली, रस्ता, चौक किंवा कोणत्याही खुल्या जागेत पाच किंवा अधिक व्यक्ती जमा होण्यास आणि मिरवणूक काडण्यास किंवा आयोजित करण्यास, शस्त्रे किंवा लाठी, तलवारी, भाले किंवा सुरा अशी शस्रे जवळ बाळगण्यास, लाऊडस्पिकराचा वापर करण्यास, घोषणा देण्यास आणि फटाके लावण्यास बंदी लागू केली आहे. कामावरील लोकसेवक, परवानगी मिळविलेले लग्न सोहळे, अंत्यविधी किंवा कोणताही खास प्रसंग किंवा जिल्हा न्यायदंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी, उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या मताप्रमाणे विश्वसनीय प्रसंग ज्याना संबंधित जिल्हा न्यायदंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी किंवा उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांकडून पूर्व लेखी परवानगी घेतली आहे त्यांना ही बंदी लागू नसेल.