राजस्थानात भीषण अपघातात दाम्पत्यासह 6 जणांचा मृत्यू

0
6

राजस्थानमधील सिरोही येथे राष्ट्रीय महामार्ग-27 वर कार आणि मालवाहू ट्रकची भीषण धडक झाली. या अपघातात दाम्पत्य आणि त्यांच्या मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. कारमधील सातही जण गुजरातमधील अहमदाबादहून जालोरला परतत होते. एका महिलेवर गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील सातही जण राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला. गुजरातमधील अहमदाबादहून जालोरला परतत असताना गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास अबू रोड परिसरातील किवरली येथे कार आणि ट्रॉलीची धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमींना अबू रोड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे गंभीर जखमी दोघांचा मृत्यू झाला.