यापुढे ‘त्या’ दोन योजनांपैकी एका योजनेचाच लाभ मिळणार

0
6

यापुढे गृह आधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा या योजनांच्या लाभार्थ्यांना दोन्ही योजनांचा लाभ एकाच वेळी घेण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
समाजकल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांनी दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतील सुधारणा अधिसूचित केली आहे. राज्य सरकारच्या महिला व बाल विकास खात्याच्या गृह आधार योजनेंतर्गत आधीच लाभ मिळवणाऱ्या अर्जदाराने समाजकल्याण खात्याच्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेसाठी अर्ज केल्यास त्या अर्जदाराला आता एक हमीपत्र सादर करावे लागणार आहे. गृह आधार योजनेचा मिळणारा लाभ रद्द करण्यासाठी हे हमीपत्र द्यावे लागणार आहे. राज्य सरकारच्या गृह आधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा काही जणांकडून एकाच वेळी लाभ घेतला जात असल्याचे आढळून आल्याने दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेत सुधारणा अधिसूचित करण्यात आली आहे.