राज्य सरकारने गोवा नागरी सेवेतील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काल जारी केला. अमीर परब यांची राज्य निबंधकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुदास देसाई यांची नागरी विमान वाहतूक संचालकपदी नियुक्ती करण्यात आली असून, गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाच्या अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. सचिन देसाई यांची पर्यावरण संचालकपदी नियुक्ती करण्यात आली असून, गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. जॉन्सन फर्नांडिस यांची खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य कर विभागाचे साहाय्यक आयुक्त नेहल तळवणेकर यांच्याकडे डिचोली नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.दरम्यान, राज्य सरकारने आयएएस कॅडरमध्ये बढती मिळालेल्या गोवा नागरी सेवेतील वरिष्ठ अधिकारी अमरसेन राणे यांची दक्षता खात्याच्या संचालकपदी काल नियुक्ती केली.