सुरक्षा दल-नक्षलवाद्यांत 36 तास चकमक
गडचिरोली, चंद्रपूरसह आंध्रप्रदेश, छत्तीसगड भागात सध्या नक्षलवाद्यांविरोधात व्यापक मोहीम उघडण्यात आली असून छत्तीसगडमधील घनदाट जंगलात काल मंगळवारी पहाटे उडालेल्या चकमकीत 20 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घालण्यात यश आले. 36 तासांनंतरही ही चकमक सुरू आहे.
छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफकडून सुरू असलेला शोधमोहीम सुरू आहे. छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यात धुमश्चक्री सुरू आहे. घनदाट जंगलात आज पहाटे 5 ते 5:30 वाजेदरम्यान चकमक उडाली. यामध्ये 20 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे. बिजापूर, सुकमा-तेलंगाणा सीमेवरही नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला.
नक्षलवाद्यांची फळी निकामी
सध्या उडालेल्या चकमकीत नक्षल चळवळीला मोठा झटका बसला आहे. या चकमकीत मोठे कॅडरचे नक्षलवादी ठार झाले आहेत. सोमवारी रात्री एक वाजेपासून ही शोधमोहीम सुरू झाली.
एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला चलपती ठार
छत्तीसगड चकमकीत एक कोटी रुपयांचं बक्षीस असलेला जहाल माओवादी चलपती ठार झाला आहे. उडीसा राज्यातील स्टेट कमिटीच्या चीफ म्हणून नक्षलवादी संघटनेमध्ये तो पदावर होता. चलपती हा जवळपास 30 वर्षापासून नक्षल चळवळीत सहभागी होता. या चकमकीत दोन महिलाही कॅडर नक्षलवादी ठार झाल्या. एक एसएलआर रायफल, अम्बुंश व ईडी स्फोटके घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहे. छत्तीसगड पोलीस सीआरपीएफ आणि इंटरेस्टेड पोलीसांच्या मदतीने ऑपरेशन यशस्वी झाले आहे.